सुविधा

ईनाम योजना

कृषि उत्पन्न बाजार समिती बार्शीचे केंद्र शासन यांचा ईनाम योजना प्रकल्पामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये निवड झालेली आहे.या योजनेमध्ये शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी बाजार आवारामध्ये आणल्यानंतर त्या शेतमालाची गेटवरच त्याची नोंद घेतली जाते. त्याची प्रयोग शाळेत तपासणी करुन तो शेतमाल ऑनलाईन विक्रीसाठी ठेवला जातो. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला जादाचा बाजारभाव मिळू लागला आहे. ऑनलाईन विक्री झाल्यानंतर लगेचच शेतकऱ्यांच्या बँक खातेमध्ये पैसे जमा केले जातात.