कृषि उत्पन्न बाजार समिती बार्शीने तालुक्यातील व आसपसच्या तालुक्यातील शेतकऱ्यांची फळे व भाजीपाला विक्रीची गैरसोय लक्षात घेता शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र असा फळे व भाजीपाला विभाग विभाग बांधलेला आहे. सदर विभागामध्ये 82 गाळे बांधलेले आहेत. तसेच शेतकऱ्यांचे फळे व भाजीपाला विक्री करणे करिता लिलावासाठी 10,000 स्कवे फुटाचे भव्य असे दोन सेल हॉल बांधलेल आहेत. बाजार समितीने फळे व भाजीपाला विभागात अंतर्गत् रस्ते, दिवाबत्ती, संडास,मुतारी, हॉटेल या पायाभूत सुविधा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केलेली आहे. तसेच दर शुक्रवारी सफरचंद या फळाची आवक मोठ्याप्रमाणात होत असल्याने सोलापूर जिल्हा व शेजारी धाराशिव, बीड, अहमदनगर इ. जिल्ह्यातील व्यापारी खरदीसाठी मोठ्या प्रमाणात येत आहेत.