कृषि उत्पन्न बाजार समिती बार्शीने तालुक्यातील व आसपसच्या तालुक्यातील शेतकऱ्यासाठी भव्य असा जनावर बाजार राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब बाजार आवार येथे विभाग स्वतंत्ररित्या बांधलेला आहे.सदर जनावर बाजारातील शेतकऱ्यांची व जनावरांची गैरसोय लक्षात घेता बाजार समितीने जनावराचे ऊन,वारा,पाऊस यापासुन संरक्षण होणेकरिता आधुनिक पध्दतीचे निवारा शेड बांधलेले आहे. त्याचप्रमाणे जनावरासाठभ् पिण्याच्या पाण्याकरिता या विभागात 3 पाण्याचे मोठे हौद बांधलेले आहेत. जनावर बाजार विभागामध्ये जनावरे विक्रीस आणणाऱ्या शेतकऱ्याची गैरसोय लक्षात घेता बाजार समितीने बाजार विभागात आठवडी हॉटेल्स तसेच शेतकऱ्यांना निवारा शेडमध्ये बसण्यासाठी कट्टे त्याचप्रमाणे जनावरे वाहनामध्ये उतरणे व भरणसाठी धक्के बांधलेले आहेत.