कृषि उत्पन्न बाजार समिती, बार्शी

दक्षिणोत्तर भारताच्या लहान मोठ्या पेठाशी सचोटीने व्यापार करणारी व मराठवाड्याच्या प्रवेशद्वाराशी विनटलेली शेतकरी व व्यापारी यांची एकमेव विश्वासपात्र पेठ म्हणजेच कृषि उत्पन्न बाजार समिती बार्शीचे पंडीत जवाहरलाल नेहरु प्रिन्सिपल मार्केट यार्ड बार्शी. सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुके व मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यातुन उदा. लातूर, बीड, धाराशिव, अहमदनगर या जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून शेतमाल विक्रीसाठी बार्शी बाजार समिती मध्ये येतो. येथे शेतमालाला मिळणारा योग्य व किफायतशिर बाजार भाव, योग्य व अचुक वजन व शेतमालाची ताबडतोब मिळणारी पट्टी यामुळे बार्शी बाजार समितीचा नावलौकीक अवघ्या महाराष्ट्रामध्ये आहे. कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये ज्वारी, कडधान्य, तेलबिया यांची मोठ्या प्रमाणामध्ये आवक होत आहे.

कृषि उत्पन्न बाजार समिती, बार्शी या संस्थेची स्थापना ९ जूलै १९४७ रोजी आली. नुकतेच या संस्थेने अमृतमहोत्सवी टप्पा पार केलेला आहे. तसेच उपबाजार आवार वैराग ची स्थापना २१/१२/१९५५ रोजी झालेली आहे. बाजार समितीच्या नियमनाचे कार्यक्षेत्र म्हणून संपूर्ण बार्शी तालुका ठरविण्यात आलेला आहे. बाजार क्षेत्रामध्ये एकुण दोन मार्केट यार्ड आहेत. त्या पैकी वैराग हे दुय्यम मार्केट यार्ड असून मुख्य बाजार आवार पंडीत जवाहरलाल नेहरु म्हणून संबोधले आहे. वैराग येथे बाजार समितीच्या स्वताःच्या मालकीच्या जागा आहेत. बार्शी येथे पंडीत जवाहरलाल नेहरु मार्केट यार्ड मध्ये शेतकरी व इतर व्यवसायिकांसाठी निरनिराळ्या उपयुक्त सुखसुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. प्रि. मार्केट यार्ड ४२ एकर १८ गुंठे व उपबाजार आवार वैराग २५ एकर या क्षेत्रफळामध्ये आडत बाजार, जनावार बाजार, कांदा, मिरची, लसूण, बटाटा तसेच फळे व भाजीपाला बाजार भरतो.