कृषि उत्पन्न बाजार समिती बार्शीने मुख्य बाजार आवारातील जागा विकसीत करुन सदर जागेमध्ये भविष्य काळामध्ये पर्यावरणाचा नैसर्गिक समतोल राखून प्रदूषण रोखणेकरीता प्राचिन दुर्मिळ जातीची आयुर्वेदिक व वनौषधी स्वरुपाची वृक्षाची लागवड केलेली आहे. त्यामुळे बाजार समितीच्या निसर्ग सौंदर्यामध्ये वाढ झाली असून कृषि उत्पन्न बाजार समिती बार्शी हे एक प्रेक्षणिय व नैसर्गिक सौदर्य असलेले स्थळ होणार आहे. व पर्यावण प्रेमी, निसर्गप्रेमी यांचे आकर्षण स्थळ होणार आहे. तसेच बाजार समितीने भविष्य काळामध्ये मुख्य बाजार आवार उपबाजार वैराग व गट नं. १३९८/२ लातूर रोड आवार या बाजार समितीच्या जागेमध्ये वृक्षारोपन व वृक्षसंवर्धन करण्याचे ठरविले आहे. तसेच येथे विकसीत केलेल्या जागेमध्ये शेतकरी व इतर बाजार घटक यांच्या आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीने ओपन जिम सुरु केलेली आहे. बाजार आवारामध्ये पत्येक दुकाना समोर वृक्षाची लागवड केलेली आहे. सदर वृक्ष संवर्धनासाठी व बाजार घटकांना पिण्यासाठी पाण्याची तोटी उपलब्ध केलेली आहे. तसेच उपबाजार वैराग येथे २००० झाडांचा लागवडीतून ऑक्सीजन पार्क निर्मिती केलेली आहे.