कृषि उत्पन्न बाजार समिती बार्शी मुख्य बाजार आवारातीलमुख्य प्रवेशद्वाराच्या समोरील बाजूस व कार्यालयीन इमारतीच्या दक्षिणेकडील बाजूस संरक्षण भिंतीशेजारी खुली जागा विकसीत करुन सदर जागेमध्ये पर्यावराचा नैसर्गिक समतोल राखण्याकरिता व प्रदूषण टाळण्याकरिता सदर जागेत फुलांची झाडे, शोभेची झाडे व लॉन तसेच शेतकरी महिला, शेतकरी, हमाल, तोलार, मुनीम इ. घटकांच्या स्मृती बसविण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे बाजार समितीच्या सौंदर्यात भर पडलेली आहे.